जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – आगामी आठवड्यात विज संदर्भात लवकरच कार्यवाही होऊन वीजप्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
देशभरात विजेचा प्रश्न गंभीर असून केवळ भाजपचे शासन असलेल्या राज्यात विजेचा प्रश्न कमी आहे. कारण कोळसा उत्पादन आणि वितरण हे केवळ मोजक्याच ठिकाणी केले जाते, भाजप शासन असलेल्या राज्यांना कोळसा पुरवठा नियमित होत असल्याने तेथे वीजप्रश्न कमी आहे, परंतु महाराष्ट्रा पुरते सांगायचे तर राज्यात ऐन उन्हाळ्यातच नव्हेतर गेल्या काही महिन्यापासून वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा केला जात नाही, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मागणीच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने वीजटंचाई निर्माण झाली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना तोडगा काढण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. सोमवार मंगळवार नंतर याबाबत योग्य तो निर्णय होईल.
केंद्राकडून सत्तेचा गैरवापर
तसेच देशात केंद्रात असलेले सरकार त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करीत असून राज्यात अधिकार नसताना, सत्तेत वा प्रशासनात हक्क नसताना हस्तक्षेप करीत आहेत, परंतु लोकभावना लक्षात घेता लोकांची भूमिका तीच आमची भूमिका आहे असेही ते इडीच्या होत असलेल्या कारवायांसंदर्भात पवार यांनी म्हटले आहे.