Home Cities पाचोरा आकाश महालपूरे ठरला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन पुरस्काराचा मानकरी

आकाश महालपूरे ठरला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन पुरस्काराचा मानकरी


पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील गोंदेगाव येथील भूमिपुत्र आकाश दिपक महालपूरे यांना नुकतेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, (लंडन) बेस्ट रायटर अवार्ड – २०२१ ने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन या संस्थेतर्फे जगातील प्रतिभावंत व्यक्तींची निवड करण्यात येते. यावर्षी आकाश दिपक महालपूरे यांची जागतिक समितीने निवड केली आहे.

साहित्यीक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याने व कोराना काळात लोकांमध्ये लिखाणातून सकारात्मक गोष्टी रूजवाव्या या भावनेतून सतत नवनवीन लेखन करून देशाच्या सुजाण नागरिक घडावा. यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा जागतिक पुरस्कार बहाल करण्यात आला. वैचारिक मांडणी समाजात करत असलेल्या साहित्यातील अनमोल कार्यामुळे आकाश महालपूरे हे प्रसिद्ध साहित्यीक आहे. नुकतेच त्यांना साहित्यातील विविध राज्यस्तरीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच मित्र परिवारातून, समाजातून अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound