आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम थांबवा : राष्ट्रवादी महानगरची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौक या ठिकाणी सुरु असलेले सर्कलचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, शहरातील महाबळ कॉलनी, संभाजी नगर, रायसोनी नगर, आदर्श नगर, मोहाडी रोड परिसरातील नागरीकांचा येण्या-जाण्यासाठी या चौकातून मोठ्या प्रमाणावर व सातत्याने वापरहोत असतो. या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे ट्रॅफीकला अडथळा निर्माण होत आहे. तरी सदर निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, तरी याविषयी चौकशी करून सर्कलचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. सदरहू बांधकाम न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, अमोल कोल्हे, राजू मोरे, जितेंद्र चांगरे, विशाल देशमुख, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/212673194343329

 

Protected Content