आकाशवाणी चौकातील बँकेसमोरून एकाची दुचाकी लांबवली

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील आकाशवाणी चौक रोडवर असलेल्या बँकेसमोरून तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर इंद्रकुमार मेहता (वय-३३) रा. कवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापारीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सागर मिळत आहे. त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीटी ५४९१) ने आकाशवाणी चौकाजवळील युनियन बँकेसमोर असलेल्या मनोहर अपार्टमेंट येथे आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी ही अपार्टमेंटच्या समोर पार्किंग करून लावली होती. आज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. रात्री साडेआठ वाजता ते परत आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी न आढळून आल्याने गुरुवार १सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सागर मेहता यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम वागळे करीत आहे.

Protected Content