पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे हनुमंतखेडे येथील कै.प्रविण ज्ञानेश्वर पाटील यांचे विहिरीचे खोदकाम करत असतांना दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या प्रयत्नांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी २ लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कै.प्रविण हे कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती. याची दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून कै.प्रविण यांच्या कुटुंंबियांना २ लक्ष रूपये मंजुर करून आणले. कै.प्रविण यांच्या वारस पत्नी मनिषा प्रविण पाटील यांना २ लक्ष रूपयाचा धनादेश देतांना आमदार चिमणराव पाटील सोबत तहसिलदार अनिल गवांदे, लिपिक विठ्ठल वारकर, दासभाऊ पाटील, लक्ष्मण पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.