पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या अभावामुळे आपल्या आपले स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून सामाजिक भावनेतून विजय राठोड यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
समाजासाठी अहोरात्र झटणाऱे तालुक्यातील आंबे वडगांवचे भुमिपुत्र विजय राठोड यांच्या सामाजिक भावनेतून तालुक्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब तरूणांना यु. पी.एस.सी., एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा सारख्या परीक्षेपासून वंचित राहू नये व घवघवीत यश संपादन करावे यासाठी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. मोठमोठ्या परीक्षेसाठी मुंबई किंवा पुणे विद्यापीठात आमच्या खेड्यापाड्यातील तरुण जाऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या तालुक्यातच परीक्षेचे मार्गदर्शन व पुस्तके अभ्यासासाठी मिळावे ही मागणी आमदार किशोर पाटील व सुमित किशोर पाटील यांच्याकडे केली असता तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी त्वरित या विषयावर लक्ष केंद्रित करून अवघ्या दोन ते तीन दिवसात पुस्तके उपलब्ध करून दिली. युवानेते सुमित किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती पुस्तके वाटप करण्यात आली. विजय राठोड, सुमित किशोर पाटील यांच्यासह आंबेवडगाव, आंबेवडगाव- तांडा नंबर १, तांडा नंबर – २ जोगे, कोकडी, अशा पाच गावात भोला पाटील, अमोल पाटील, बबलू तडवी, डॉ. शामकांत पाटील, काशिनाथ चव्हाण, या सेनेच्या पदाधिकाऱ्यां मार्फत तरुणांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.