रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अहीरवाडी परीसरात वादळामुळे केळीचे नुकसान झाली आहे तर एका २८ वर्षीय युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने जखमी झाला आहे.तर काही घरां वरील पत्रे देखिल उडल्याचे वृत्त आहे.तसेच काही प्रमाणात पाऊस देखिल झाला आहे.
याबाबत वृत्त असे की अहीरवाडी परीसरात वादळी वाऱ्याने दस्तक दिली असून यामुळे काही शेतक-यांचे केळीचे नुकसान झाले आहे. अहीरवाडी गावात काही घरां वरील पत्रे उडाले असून प्रशांत कौतिक सावळे हा युवक त्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जात असतांना त्यांच्या डोक्यावर सुबाभुळ या झाडाची फांदी पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर गोपाळ धनगर या शेतक-याचा केळीचा बाग पूर्ण झोपला आहे. घटनेची माहीती मिळताच संदीप सावळे घटनास्थळी पोहचुन पाहणी करत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/267479975568988