Home Cities जळगाव अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत प्रतिमा पूजन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत प्रतिमा पूजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील महापालिकेच्या सभागृहात बुधवारी  सकाळी १० वाजता पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जयंतीच्या निमित्ताने जळगाव शहरातील शासकीय कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या अनुषंगाने जळगाव महापालिकेच्या सभागृहात बुधवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत वानखेडे, सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर, नगर रचनाकार सहाय्यक संचालक  के. पी. बागुल, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, अधीक्षक अविनाश बाविस्कर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound