रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आहिरवाडी गावात गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर रित्या आढळून आल्याने एका विरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दारूने भरलेले १५ प्लॅस्टीकचे कॅन हस्तगत केले आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आहिरवाडी गावात बेकायदेशीर रितीने गावठी हातभट्टी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत मंगळवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी विजय पुंडलिक वाघ रा. अहिरवाडी ता. रावेर घरात त्याच्या ताब्यात ७०० रूपयाची १० लीटर गावठी हातभट्टी हस्तगत केली आहे. १५ प्लॅस्टीक कॅनमध्ये हातभट्टी मिळून आली. संशयित आरोपी विजय वाघ यांच्या विरोधात पो.कॉ. निलेश लोहार यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. नितीन डाबरे करीत आहे.