अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग : १० मृत्युमुखी

अहमदनगर, वृत्तसेवा | येथील जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आग लागून सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. यापैकी १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

 

आयसीयू कक्षामध्ये १७ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.

 

या आगती मृत्युमुखी पाडलेल्या मृतकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. यात रामकिसन विठ्ठल खरपुडे, सिताराम दगडू जाधव,,सत्यभामा शिवाजी घोडेचौरे,कडूबाई गंगाधर खाटीक,शिवाजी सदाशिव पवार, दीपक विश्वनाथ जडगुळे,,कोंडाबाई मधुकर कदम,आसराबाई गोविंद नागरे,शाबाबी अहमद सय्यद,अनोळखी पुरुषाचा समावेश आहे.

Protected Content