बारामती (वृत्तसंस्था) अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश दत्तात्रय पासलकर (रा. पासलकरवस्ती, दौंड) याने १३ जुलै २०१९ रोजी आरोपीने फिर्यादीची इच्छा नसताना बारामती तालूक्यातुन दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे मित्राच्या घरी नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करत अश्लील छायाचित्रे काढली. तसेच मी बोलावल्यावर तु येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेल अशी धमकी देत तो वारंवार पीडितेवर बलात्कार करत होता. या गोष्टीसाठी एकदा त्याला त्याच्या आईने देखील मदत केलायचे पिडीतेने म्हटले आहे. दरम्यान, आरोपींविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.