जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाची तब्बल ७ लाख ७७ हजार ७४५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक धारक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गुरूकुल कॉलनी परिसरात एका व्यावसायिक वास्तव्याला आहे. १६ जून रोजी फेसबुकच्या माध्यमातून व्यावसायिकाची अनोळखी महिलेशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर महिलेने कामोद्दिपक भावना निर्माण करून तरूणाचा अश्लिल व्हिडीओ बनविला. तो व्हिडीओ तरूणाच्या व्हॉटसॲप टाकून व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, व्यावसायिक हे बदनामी होईल या भितीपोटी दिलेल्या बँक अकाऊंट आणि गुगल-पेच्या माध्यमातून वेळोवेळ एकुण ७ लाख ७७ हजार ७४५ रूपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर महिलेच्या धमकीला कंटाळून व्यावसायिकाने बुधवारी २१ जून रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात फेसबुक धारक महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.