जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज । तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूचे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी मंगळवारी ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीर व अवैधरित्या वाळूची वाहतूक होत आहे. दरम्यान मंगळवारी ९ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कोतवाल किशोर शालिग्राम चौधरी यांनी धडक कारवाई करत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालक रऊफ शेख यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. याप्रकरणी कोतवाल किशोर शाळीग्राम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मालक शेख रऊफ शेख रा. आव्हाणे ता.जि. जळगाव याच्या विरोधात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे