जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकात जवळील दत्त मंदिराजवळ चहाच्या टपरीवर अवैधरित्या घरगुती गॅस वापरणाऱ्या दुकानदारावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत शुक्रवार ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, शहरातील आकाशवाणी चौकजवळ असलेल्या दत्त मंदिराच्या ठिकाणी चहाची टपरी ही नितीन द्वारकादास वाणी (वय-३१) रा. इच्छादेवी मंदिरामागे, जळगाव ह्या तरुण घरगुती गॅसचा वापर चहा टपरीवर लावून व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. पोलिसांनी कारवाई करत गॅसची शेगडी, गॅस हंडी जप्त केली आहे. या संदर्भात पोलीस कर्मचारी विकास सुभाष पहुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टपरीधारक नितीन द्वारकादास वाणी याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहे.