Home क्राईम अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावा तालुक्यातील नशिराबाद येथे बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरातील कुरेशी मोहल्ला येथे दोन गोमांस विक्री करत असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता पोलीसांनी कारवाई करत शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (वय-४२) आणि जमील अहेमद शेख मुसा कुरेशी (वय-४५) दोन्ही ना. कुरेशी वाडा, नशिराबाद ता.जि.जळगाव या दोघांना ताब्यात घेत दोघांकडून १६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २४ जानेवारी रोजद सकाळी १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.


Protected Content

Play sound