यावल, प्रतिनिधी । मंगळवार १७ मार्च रोजी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. या पावसात यावल व चोपडा तालुक्यातील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी जि. प. आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवारी आलेल्या यावल व चोपडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे गहू, हरभरा, केळी व मका इत्यादी पिकांसह रब्बी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी फारच बिकट संकटात सापडला आहे. यानुकसानीची पाहणी जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी समक्ष शेतावर जाऊन केली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने त्याबाबत शासनाकडून तात्काळ मदत मिळण्यात यावी या आशयाचे निवेदन रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेवून निवेदन देत मागणी केली आहे.