Home क्राईम अल्पवयीन मुलीस पळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
44

 

पारोळा, प्रतिनिधी । शहरातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना १८. रोजी घडली.

शहरातील  अल्पवयीन मुलगी १६ मार्च शिवण क्लास जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती घरी परतली नाही. यामुळे १७ मार्चला ती हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी नितीन जगन वाणी (रा.झपाट भवानी चौक, पारोळा) याने लग्नाचे आमीष दाखवून तिला फूस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले. यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी १८ मार्चला संशयित नितीन वाणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound