अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्या संशयिताला अटक

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील खंडोबा यात्रा पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयित आरोपीला फैजपूर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. यावल तालुक्यातील फैजपूर येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघेजण रविवार २० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आले होते. दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिडीत मुलीसह तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तीघे घरी जात होते. त्याचवेळी जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर हे दुचाकीवर आले. दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का दिला व “मुलीला सोडले नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवून पिडीत मुलीचा दुचाकीवर बसवून पसार होते.

याबाबत दोघांनी लागलीच फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील जीवन भालेराव याला फैजपूर पोलीसांनी शनिवार ९ एप्रिल रेाजी सकाळी अटक केली आहे. चौकशी केली असता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचाराचा कलम वाढविण्यात आले. संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.

Protected Content