Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियासह रात्री झोपलेली असताना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार १७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास लक्षात आला. मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या सर्वत्र शोध घेतला ,परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound