जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करुन फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सुप्रिम कॉलनीतून अटक केली.
शहरातील सुप्रिम कॉलनतील मुकेश अशोक पाटील (वय-२५) या संशयति तरुणाने अहमदाबाद येथील अलीस ब्रिज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केले होते. दरम्यान मुकेश याच्यावर पोस्को ॲक्टनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुकेश हा फरार होता. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करुन संशयीत आरोपी मुकेश पाटील याला ६ रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी परिसरातून अटक करीत त्याला अलीस ब्रिज पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, विकास सातदिवे, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली.