Home क्राईम अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवार १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दोन जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद गावातील एका भागात राहणारे १६ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ती शाळेत शिकते शुक्रवार १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अल्पवयीन मुलगी ही शाळेत असताना गावात राहणारा प्रथमेश पाटील व दुर्वेश वाघूळदे यांनी अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने घरी जाऊन नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी शनिवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रथमेश पाटील व दुर्वेश वाघुळदे या दोघांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound