भुसावळ, प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना अत्यंत हिन भाषेत अपशब्द बोलणाऱ्या अर्नब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करून सी. आय. डी. चौकशीची मागणी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, पालघर येथे सांधुच्या झालेल्या खुन प्रकरणामध्ये चॅनल वरती चर्चा सुरु असतांना अर्नब गोस्वामी यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलून जाती जातीमध्ये तेड निर्माण होईल असे शब्द त्यांनी वापरलेले आहे. हिंदु मुस्लीम व खिश्चन धर्माच्या विरोधात जातिय वातावरण तयार करुन दंगली भडकवण्याचे काम अर्णव गोस्वामी करित आहे. भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्णव गोस्वामी यांना त्वरीत अटक करावे अशी मागणी केली आहे. पालघर येथे साधुच्या खुनाचा काँग्रेसतर्फे जाहिर निषेध करण्यात आला. साधु संत ही महाराष्ट्र राज्याची परंपरा असून शहर काँगेस कमिटीतर्फे सांधुना मारण्याचा हा पूर्व नियोजीत कट असण्याची शक्यता व्यक्त करून सी.आय.डी. मार्फत चाकशीची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश समन्वयक भगवान मेढे, प्रदेश सचिव अनिता खरारे , शैलेंद्र आहिरे आदींच्या स्वाक्षरी आहे.