जळगाव प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे या विषाणूवर मात करणार्यांची संख्यादेखील वाढत असून आज सायंकाळपर्यंत एकूण ५५६ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील इतर ठिकाणांच्या तुलनेत खूप जास्त आहे. तथापि, आता जिल्ह्यात कोरोनावर मात करणार्या रूग्णांची संख्या देखील वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात आजवर एकूण ११६५ कोरोना बाधीत आढळून आले असून यातील ५५६ रूग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. वेळीच निदान होऊन योग्य उपचार झाल्यास कोरोना बरा होऊ शकतो. यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.