Home आरोग्य अरुणाचल प्रदेशात कोरोनाच्या भीतीने महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

अरुणाचल प्रदेशात कोरोनाच्या भीतीने महिला अधिकाऱ्याची आत्महत्या


इटानगर (वृत्तसंस्था) भारतात आता कोरोना व्हायरससंदर्भात भीती निर्माण झाली आहे. त्यातूनच अरुणाचल प्रदेश येथे महिला अधिकाऱ्याने शुक्रवारी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

पापुम पारे येथे आपत्ती निवारण अधिकारी शेरिंग युंगजोम (३८) यांनी जिल्हा उपायुक्त यांना उद्देशून आपले राजीनामा पत्र लिहून बाथरुममध्ये स्वत:ला फाशी लावून घेतली. संबंधित अधिकारी महिलेल्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारिरीत त्रास सहन न झाल्याने आणि कोरोनाग्रस्त असल्याची भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.


Protected Content

Play sound