चोपडा प्रतिनिधी । अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन व बांधकामास सुरुवात झालेली आहे. श्रीराम जन्माला येण्याच्या ३५ वर्षे आधी महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. त्यातील प्रत्येक पात्र व प्रसंगांनुरूप रामायण घडत गेले. वाल्मिक ऋषी यांचेही मंदीर उभारण्यात यावे अशी मागणी वाल्मिकी समाजाकडुन करण्यात येत आहे.
अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन व बांधकामास सुरुवात झालेली आहे. श्रीराम जन्माला येण्याच्या ३५ वर्षे आधी महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. त्यातील प्रत्येक पात्र व प्रसंगांनुरूप रामायण घडत गेले. अयोध्येतील राम जन्मभूमीत हनुमान यांची गढि (मंदिर) आहे. त्याच परिसरात रामायणकार, वाल्मिकी ऋषी यांचे मंदिर व्हावे, अशी इच्छा समस्त कोळी समाजाच्या अंतर्मनात आहे. ती इच्छा श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षा वाल्मिकी समाजाकडुन करण्यात येत आहे.
भारतीय वाल्मिकी धर्मगुरू डॉ. देव सिंह अद्वैती महाराज (संगरूर,पंजाब ) यांनाही अयोध्या येथील राममंदीर भुमीपूजन कार्यक्रमाचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले होते. देशातील महर्षी वाल्मिकी समाजासाठी ही सन्मानाची बाब आहे. रामजन्मभुमी मंदिर ट्रस्टतर्फे महर्षी वाल्मिकी ऋषींचे मंदिर अयोध्या येथे स्थापित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चोपडा येथूनही आदिवासी वाल्मिकी कोळी समाजातर्फे तशा आशयाचे विनंतीपत्र राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडे ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेले आहे.अशी माहिती मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी दिली