Home आरोग्य अयोध्येत आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण !

अयोध्येत आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण !


अयोध्या (वृत्तसंस्था) मुख्य पुजारी सतेंद्र आणि त्यांच्या सहाय्यकालाही कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा राम लल्लांच्या आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे साधु संतांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अवघे दोन दिवस राहिलेले असतांनाच आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या आधी मुख्य पुजारी सतेंद्र आणि त्यांच्या सहाय्यकालाही कोरोनाची लागण झाली होती. भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने खास काळजी घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑगस्टला सकाळी अयोध्येत येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत.


Protected Content

Play sound