पुणे : वृत्तसंस्था । १५ जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत देशातल्या ११ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्टय आहे. शंभर आणि दहा रुपये कुपनच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे कार्य करण्यात येईल” असे आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.
“अयोध्येत. सध्या कोषामध्ये ७८ कोटी रुपये आहेत. त्यातले २४ कोटी रुपये आम्ही लार्सन अँड टुब्रोला देणार आहोत. कोषामध्ये जमा असलेली रक्कम सातत्याना वाढत आहे” अशी माहिती रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य किशोरजी व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांनी दिली. ते पुण्यामध्ये बोलत होते.
“२०२४ च्या आत राम मंदिर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण घाई करुन मंदिराच्या दर्जामध्ये फरक पडू देणार नाही. सुरक्षित, एक हजार वर्षापर्यंत टिकणारे मंदिर उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तज्ज्ञ, आर्किटेक्टकडून आराखडे मागवणार आहोत. त्या पायावर मंदिर उभे राहिल” असे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक गोष्टी सुरु झाल्यात पण अजून मंदिर खुली झालेली नाहीत, त्या संबंधीच्या प्रश्नावर ‘देव सर्वांना विपुल सुबुद्धी देवो’ एवढेच उत्तर आचार्य किशोरजी व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांनी दिले.