‘अम्फान’ वादळ : बंगालला केंद्राकडून 1 हजार कोटीची पॅकेज !

कोलकाता (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील होत्या.

 

पाहणी नंतरच्या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे. पंतप्रधान मदत निधीतून चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘पश्चिम बंगाल कोरोना आणि अम्फान या दोन समस्यांशी लढत आहे. कोरोनाशी लढण्याचा मंत्र म्हणजे जिथे आहे तिथेच रहाणं. परंतु वादळाचा मंत्र शक्य तितक्या लवकर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आहे. या वादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले. असे असूनही 80 लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही याबद्दल वाईट वाटते. संकटाच्या या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. कृषी, वीज क्षेत्र आणि व्यापाराचेही नुकसान झाले. लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. आता त्यांना मदत करणे हे आमचे काम आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य तेवढी मदत करतील,असेही मोदी म्हणाले.

Protected Content