Home आरोग्य अमेरिकेत कोरोनाचे थैमान ; २४ तासांत ३१७६ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचे थैमान ; २४ तासांत ३१७६ जणांचा मृत्यू


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे ३१७६ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ५० हजाराच्या जवळपास पोहचली आहे.

 

अमेरिकेत शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण ८ लाख ६७ हजार ४५९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, ४९ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४६ लाख जणांची चाचणी झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये २ लाख ६० हजारांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली असून २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्येही एक लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound