मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी अमेरिकेने भारताला आरोग्य सहाय्यता रूपात ५.९ मिलियन डॉलरची मदत केली आहे. दरम्यान, भारतानेही हायड्रॉक्सीक्लोकोक्वीन पाठवून अमेरिकेची मदत केली आहे.
अमेरिकेकडून गेल्या २० वर्षात दिल्या जाणाऱ्या २.८ बिलियन डॉलरच्या सहायता निधीतील एक भाग आहे. १.४ बिलियन डॉलर स्वास्थ सहाय्यता रूपात दिला जात आहे. या पैशांचा वापर हा भारतात कोरोना पीडितांच्या मदतीसाठी वापरावा. त्यासंदर्भातील जागरूकता अभियान आणि त्याच्या उपाययोजनांकरता याचा वापर करा. या सहायता राशीचा वापर हा त्याच्या आपातकालीन तयारी करता करू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका सुरूवातीपासूनच एनजीओंना सहायता राशी प्रदान करत आहे.