अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये ; विशाखा राऊत

 

मुंबई, वृत्तसंस्था । भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली. त्यांच्या या टीकेला सेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांनी प्रतिउत्तर देत अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये असे आव्हान केले आहे.

विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाही. त्या फक्त माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकलं असतं. पण, अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही अशी टीका केली आहे.

तुम्ही राजकारणात कधी आला? तुमचे पती जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा राजकारणात दिसायला लागल्यात. शिवसेना ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी ही राजकारणामध्ये आहे. त्यामुळे आम्ही काय करावे, हे आम्हाला शिकवू नये, आम्हाला संस्कृती आहे. त्यामुळे आम्हाला बोलायला भाग पाडू नये, जर बोलायचं असेल तर आमच्या महिला आघाडी समोर येवून बोलून दाखवावे, असं आव्हान विशाखा राऊत यांनी दिले आहे.

Protected Content