जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलाड भागात राहणाऱ्या एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील पैलाड भागामध्ये एका २७ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नरेंद्र हिम्मतराव अहिरराव रा. तांबेपुरा ता. अमळनेर याने शाळेतून खिचडीचे सामान चोरत असताना महिलेने बघितले. या संदर्भात विचारला असता त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तर तिच्यासोबत असलेल्या एका बाईच्या कानशिलात मारून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नरेंद्र हिम्मतराव अहिरराव रा. तांबेपुरा ता. अमळनेर यांच्या विरोधात शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील करीत आहे.