अमळनेर येथे हुतात्मा दिनानिमित्त मशाल रॅली

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यात खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा दिनानिमित्त शहीदांना अभिवादन करण्यासाठी मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण व्हावा म्हणून खान्देश रक्षक संघटनेतर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सानेगुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५०० फुटाचा तिरंगा धरला होता. एका जीपवर हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाबाहेरील पुतळ्याचे पूजन करण्यात आले. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. यानतर मशाल प्रज्वलित करून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीचे आयोजन खान्देश रक्षक संस्थेचे संयोजक विवेक पाटील, तालुकाध्यक्ष विजय सुर्यवंशी, उपाध्यक्ष विलास महाले, धनराज पाटील, हर्षल पाटील, महेंद्र बागुल, शरद पाटील, राजेंद्र यादव व आजी माजी सैनिकांनी केले होते. रॅलीत खान्देशातील आजी माजी सैनिक, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, संजय पाटील, संदीप घोरपडे, हेमकांत पाटील, मनोज शिंगाणे, आशिष पाटील , गुरव आदी सहभागी झाले होते. नाट्यगृहापासून सुभाष चौक , तिरंगा चौक या मार्गाने रॅलीचे विसर्जन सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

Protected Content