अमळनेर : प्रतिनिधी । पालिकेच्या विषय समिती सभापती निवड पिठासन अधिकारी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पार पडली
नियोजन समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांची तर बांधकाम सभापती सुरेश पाटील , पाणीपुरवठा सभापती राजेश पाटील व शिक्षण सभापती पदी प्रा कुमाररामकृष्ण पाटील यांची पुनश्च निवड करण्यात आली
महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या संगीता संजय पाटील तर आरोग्य सभापतिपदी घनश्याम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली
ही निवड बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील , नगराध्यक्ष पुष्पलता पाटील , मनोज पाटील , विवेक पाटील , विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक , सलीम शेख , नूतन महेश पाटील ,प्रताप शिंपी यांचे सहकार्य लाभले. पिठासन अधिकारी मिलिंद वाघ याना मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , संजय चौधरी , सभा लिपिक महेश जोशी यांचे सहकार्य लाभले