अमळनेर तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थींचे अपहरण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मारवड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातीलएका गावात १७वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. इयत्ता दहावीत शिकत असल्याने सध्या तिचे दहावीची परिक्षा सुरू आहे. सोमवारी २० मार्च रोजी पिडीत मुलगी ही दहवीचा पेपर देण्यासाठी सकाळी घरून निघाला. पेपर दिल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून अपहरण केले. सायंकाळपर्यंत पिडीत मुलगी ही घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content