Home Cities अमळनेर अमळनेरात ३६ हजाराचा गुटखाचा साठा जप्त; एकावर गुन्हा

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखाचा साठा जप्त; एकावर गुन्हा


अमळनेर प्रतिनिधी । गुटखा विक्री करण्यासाठी घरातच साठा करणाऱ्या शिवाजीनगर मधील एका तरुणाच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून 36 हजराचा माल जप्त करून त्यास अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक रवींद्र पाटील, पोलीस नाईक दीपक माळी व महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी यांनी नवीन स्वामिसमर्थ मंदिराजवळील शिवाजीनगर भागात राकेश हिरालाल या तरुणाच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरात विमल गुटख्याचे 23 पाकिटे, बाबा ब्लॅक तंबाखू 19 पाकिटे, दिललागी सुपारी 44 पाकिटे, विमल जर्दा तंबाखू 23 पाकिटे , लहर सुगंधित तंबाखू 33 पाकिटे, बागबान तंबाखू 18 पाकिटे व 8 डबे, बागबान 440 तंबाखू 30 पाकिटे, रोजी सुगंधित सुपारी 300 पाकिटे, टोबॅको सिल्व्हर व लाल प्रत्येकी 29 पाकिटे , रत्ना 300 तंबाखू 8 पत्री डबे, सुगंधित बुलेट किमाम 3 काचेच्या बाटल्या असा एकूण 36 हजार 660 रुपयांचा माल जप्त करून आरोपी राकेशला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.


Protected Content

Play sound