अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील धुळे रस्त्यावरील भारत गॅस गोडाऊनच्या मागील बाजूला सर्वत्र नगर येथे ऍड. किशोर बागुल यांच्या राहत्या घरी आज सकाळी 10.05 ते 10.55 दरम्यान सुमारे तीन लाख 85 हजार 200 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली.
ऍड. किशोर बागुल हे आज सकाळी ठीक 10.05 वाजता त्यांच्या पत्नी सोबत ग्लोबल इंग्लिश स्कुल येथे त्यांच्या मुलाचा निकाल पाहण्याकरिता गेले होते. त्यानंतर ते ठीक 10.55 वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना बेडरूम मधील कपाटातील काही सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे घरात काही तरी घडले असल्याची कल्पना आल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता घरातील मागील बाजूस असलेला दरवाजेच्या कडी कोंडा तुटलेला दिसला.तेव्हा चोरी झाल्याचे समजले असता यावेळी घरातील सुमारे 75 ग्रॅम वजनाचे सोने,10200(दहा हजार दोनशे रुपये रोख )असे एकूण 3,85,200 (तीन लाख पंच्याशी हजार दोनशे रुपयांची )चोरी झाल्याचे समजले.
यात 2,35,000 (दोन लाख पस्तीस हजार )किंमतीची एक सोन्याची 47 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 80,000 (ऐंशी हजार )किंमतीची एक सोन्याची 16 ग्रॅम वजनाची लहान पोत, 60,000 (साठ हजार )किंमतीची एक सोन्याची 12 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स ,10,200 रुपये रोख त्यात 500,100 दराच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण 3,85,200 रुपयांची चोरी झाल्याची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात ऍड. किशोर बागुल यांच्या खबरीवरून देण्यात आली आहे.