अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गांधलीपुरा येथील राहिवाशी यांची जागा बेकायदेशीरित्या हडप करण्याच्या इराद्याने बनावट दस्तऐवज तयार करून मारहाण करून जबरदस्ती वाहनाची चोरी करण्याऱ्या १६ जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रज्जाक रमजान तेली (वय-४८) रा.गरीब नवाज चौक, गांधलीपुरा हे व्यापारी आहे. त्याच्याकडे व्यापार करण्यासाठी दुचाकी आहे. त्यांच्या ओळखीचे कांती उर्फ कमाला रमजान तेली, बाबु रमजान तेली, आसिफ रमजान तेली, रहिम रमजान तेली, अक्रम तेली, मोहंमद करीत तेली, सादीक बाबु तेली, करीत रमजान तेली, असिम कमाल तेली, नाहीद रहिम तेली, अनाम रहीम तेली, लतिफ हानिक तेली, शबाना कमाल तेली, हमीदा अश्पाक तेली आणि पप्पु उर्फ अमित अकबर तडवी यांनी दुचाकी घेण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून वाहन घेण्यासाठी बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात रज्जाक तेली यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. दरम्यान, तक्रारीवरून गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. अखेर न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राकेशसिंग परदेशी करीत आहे.