Home Cities अमळनेर अमळनेरात पुन्हा एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह; २० एप्रिल रोजी झाला होता मृत्यू...

अमळनेरात पुन्हा एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह; २० एप्रिल रोजी झाला होता मृत्यू !

0
22

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर येथील दाम्पत्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात मृत झालेल्या एका वृध्दाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

अमळनेर येथील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून यातील महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. यातच आता अमळनेरच्या ७३ वर्षीय वृध्दाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधीत वृध्द व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने १८ एप्रिल रोजी जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल रात्री दीड वाजता प्राप्त झाला. यात तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound