अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हास्य कविसंमेलन दि. ६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिर येथे सायंकाळी ६.३० ते १०.०० रात्री वाजेपर्यंत रंगणार आहे. पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून हास्य कवीसंमेलनास प्रारंभ करण्यात येणार आहे. या कविसंमेलनात हिंदी आणि गजलवर प्रभूत्व आणि टि.व्ही कलाकार असलेल्या प्रसिद्ध जीनत एहसान कुरैशी, दुबई, कोयला येथे हास्य कवितांचा कार्यक्रम गाजवणारे मुजावर मालेगावी, उर्दू आणि हिंदी हास्य कविसंमेलनात कविता सादर करणारे सुंदर मालेगावी, हिंदी, उर्दूवर प्रभुत्व असलेले मोहमंद इब्राहीम,नेपाळ आणि महराष्ट्र व गुजरातमधील ऑल इंडिया कविसंमेलनात सहभागी मोहमद कलिम या प्रसिद्ध हास्स्य कविंचा सहभाग असणार आहे. यात मराठी, अहिराणी, हिंदी, उर्दू भाषेतून व्यंग, विडंबमनातून उडणाार हस्स्याचे कारंजे उडणार आहेत.
अमळनेरच्या भूमिपुत्राची विशेष उपस्थिती
या हास्स्य कविसंमेलनाचे विशेष महत्व म्हणजे यात अमळनेरचा भूमिपूत्र, टिव्ही मालिका, चित्रपट, अभिनेता कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले विलासकुमार शिरसाठ यांचा विशेष सहभाग राहणार आहे.