अमळनेर प्रतिनिधी । शहरातील ढेकू रोडवरील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थान वसाहतीचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते आज दुपारी अमळनेरात आगमन झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाटाके फोडून स्वागत केले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. यात ढेकू रोडवील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थान वसाहत, पालिकेची महिला व्यायामशाळा आणि अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, जयश्री पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.