अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सायबर पोलीस स्टेशन जळगाव जिल्हा, एमकेसीएल आणि अमळनेर येथील नामवंत इन्स्टिट्यूट सुनेट कॉम्प्युटर्सतर्फे शहरातील सर्वच शाळांमध्ये कार्यक्रम झाले. यातून सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अपराधाविषयी माहिती, त्यातून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, ही माहिती दिली. या कार्यक्रमाचा समारोप अमळनेर मधील नामवंत ॲड.ललिता पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमळनेरचे पीआय विजय शिंदे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे ॲड. भारती अग्रवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाला संस्थेच्या प्रमुख ॲड. ललिता पाटील, सेक्रेटरी प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी सर्व पदाधिकारी, कॉर्डिनेटर इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेखा सैंदाणे यांनी पाहिले तर आभार प्रदर्शन रुचिता पाटील यांनी केले.
सायबर फ्रॉड व त्यापासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं या विषयी विस्तृत माहिती सुनेट कॉम्प्युटर्सचे संचालक संजय पालकर यांनी दिली. सध्या येणाऱ्या मोबाईलवर येणाऱ्या लोनच्या ऑफर्स, केबीसी मधून कॉल आहे अशी बतावणी करणारी लोक, बँकेतील अधिकारी म्हणून केवायसी च्या नावाखाली तुमच्या अकाउंट ची माहिती घेणारी फ्रॉड मंडळी याविषयी सरांनी तपशीलवार माहिती दिली. या सर्व प्रकारांपासून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी विविध फिल्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अवगत केले.
शाळेतील शिक्षक यांचे बाबतीत सायबर क्राईम च्या काही घटना घडलेल्या होत्या त्यांची या कार्यक्रमात चर्चा केली गेली. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना असलेल्या अडचणी, शंका पालकर सरांना विचारले, त्याचे त्यांनी योग्य प्रकारे समाधान केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे समाजातील सर्व स्थरातील जनतेकडून कडून कौतुक होत आहे.
विविध शाळांच्या व्यवस्थापनाच्या सोबत सुनिता पालकर, भावेश पाटील, कु. दक्षता जाधव, विवेक पाटील, प्रितेश पाटील यांनी कार्यक्रम सफल होण्यासाठी यशस्वी सहभाग दिला.