अमळनेर प्रतिनिधी । मंगळवारी येथील धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीन मध्ये शासकीय शासकीय भरड धान्य केंद्र शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्वारी, बाजरी, मका आदी धान्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्वारी, मका आणि बाजरी यांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी येथील धुळे रोडवरील शेतकी संघाच्या जीनमध्ये मालाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. काटापूजन करून ज्वारी मका बाजरी खरेदीला सुरुवात झाली. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते काटापूजन, ज्वारी पोते पूजन करून माल आणलेल्या हिंमत चिमणराव पाटील निंभोरा या शेतकऱ्याचा टोपी रुमाल नारळ वाढवून सत्कार करण्यात आला. यावेळी रविंद्र पाटील, दीपक पाटील, सचिन बेहरे, नायब तहसीलदार योगेश पवार, पुरवठा अव्वल कारकून नाना पाटील, हिशोब अव्वल कारकून अशोक ठाकरे, पुरवठा निरीक्षक साळुंखे, सहकार अधिकारी सुनील महाजन, शेतकी संघ प्रशासक गणेश महाजन, विक्रीला आणणारे निंभोरा येथील प्रथम शेतकरी हिंमत चिमणराव पाटील, शेतकी संघ व्यस्थापक संजय पाटील, शेतकी संघ कर्मचारी सुभाष पाटील, भटू पाटील, अरुण पाटील, भिकन पवार, डीएमओ संतोष पाटील आदी उपस्थित होते.
शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्याची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाचे भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका 1850, ज्वारी 2620 , बाजारी 2150 हा शेतमाल 14 टक्क्याच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा. माल खरेदी करण्यासाठी हेक्टरी ज्वारी 17.51 क्विंटल, मका 33.93 क्विंटल बाजरी 12.63 अशी खरेदी मर्यादा आहे. माहितीही व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली.
मिळू शकतो हमीभाव – सुका माल आणि प्रत चांगली असल्यास हमीभाव मिळू शकतो त्यासाठी शेतकर्यांना हे केंद्र चांगला भाव देऊ शकते. केंद्रावर शेतकी संघातर्फे आवश्यक ती सुविधा पुरविण्यात आलेली असून दोन कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. ओला मका वाळवणीसाठीही सोय करण्यात आलेली असून तालुका खरेदी विक्री संघाचा कर्मचारीही नियमित केंद्रावर येत राहतील. पण केंद्रावरील सर्व व्यवहार पाहण्यासाठी आवश्यक असलेला तहसील कार्यालयाने नियुक्त केलेला कर्मचारी शासकीय कर्मचारी केंद्रावर उपस्थित राहतील. त्यांची सही असल्याशिवाय खरेदी करता येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.