अमळनेर प्रतिनिधी । येथील समर्थ नगर एका महिलेने 25 रोजी जैतपिर येथे दुचाकी उभी करून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, शहरातील समर्थ नगर येथील पद्मावती अपार्टमेंट रहीवाशी दीपाली गुणवंत पवार येथील २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकी( क्रमांक एमएच 19 बीएच 6769) क्रमांकाची दुचाकी घेऊन आली आणि तलावाच्या काठी उभी करून सरळ तलावात उडी घेतली. योगेश धनराज बागुल यांनी ही घटना पहिली व पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कळवली त्यांनी संतोष कोळी व महेंद्र पाटील यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. मारवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.