अमळनेर प्रतिनिधी । आधी कोरोनाचा एकही रूग्ण नसणार्या अमळनेरसह तालुक्यात ज्या पध्दतीत या विषाणूचा संसर्ग पसरतोय हे पाहता जनतेने याच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाला आहे. यासाठी लॉकडाऊनच्या नियमांच्या तंतोतंत पालनासह स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर प्रारंभी अमळनेर तालुक्यात याचा कोणताही संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, गेल्या आठवड्यापासून तालुक्यात लागोपाठ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पहिल्यांदा तालुक्यातील मुंगसे येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे रिपोर्टमधून समोर आले. यानंतर अमळनेर शहरातल्या साळी वाडा येथील कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यासोबत तिच्या पतीचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने शहरातील साळी वाड्यासह परीसर सील करण्यात आला असून याला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : अमळनेरात कंटेन्मेंट झोन
दरम्यान, अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या संशयितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने १८ एप्रिल रोजी ७३ वर्षाचा वृध्द कोरोनाचा संशयित म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच २० एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. या रूग्णाचा अहवाल देखील आता पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे कोरोनामुळेच या वृध्दाचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : अमळनेरच्या कोरोना संशयिताचा मृत्यू
अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे आता दिसून येत आहे. तालुक्यात आतापर्यंत चार पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील दोघांना बळी गेल्याने तालुकाच नव्हे तर जिल्हा हादरला आहे. या पासून बचाव करण्यासाठी परिसरातील जनतेने लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी सोशल डिस्टन्सींग पाळावे. तसेच वैयक्तीक आयुष्यात स्वच्छतेची काळजी घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी साधी आजाराची लक्षणे आढळली तरी रूग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००