अमर, अकबर, अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने एकत्र राहू नये, असेच भाजपला वाटते : सत्यजित तांबे

मुंबई (वृत्तसंस्था) अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील, या रावसाहेब दानवेंच्या टीकेला या देशात अमर, अकबर, अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत, असेच भाजपला वाटते, असे जोरदार प्रतिउत्तर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे दिले आहे.

 

 

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील, असा टोला महाविकास आघाडीला लगावला होता. त्यावर आज सत्यजीत तांबे यांनी ट्वीटवर म्हटले की, भाजपाच्या स्थापनेपासूनच त्यांना हे वाटत आले आहे की, या देशात अमर, अकबर, अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीही बंच ऑफ थॉट्स मध्ये हीच शिकवण दिली आहे. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी असे म्हटले आहे.

Protected Content