जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे अभ्यागतांच्या भेटीसाठी दर सोमवार व गुरुवारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार आहे.
सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अभ्यागतांनी अत्यंत महत्वाच्या कारणासाठी प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक असेल, तरच कार्यालयात यावेत. अथवा आपले काही म्हणणे, गाऱ्हाणे अथवा तक्रार असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या collector.jalgaon@maharashtra.gov.in या ई-मेल पाठवून सुध्दा आपला प्रश्न मार्गी लावता येईल. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.