वाघा बॉर्डर वृत्तसंस्था । पाकच्या ताब्यात असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपुर्द करण्यात आले असून देशभरात जल्लोषात याचे स्वागत करण्यात आले आहे.
अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपुर्द करण्यासाठी पाकने जाणून-बुजून खूप उशीर केला. मात्र रात्री उशीरा ९.२१ वाजता त्यांना वाघा बॉर्डरवर भारतीय अधिकार्यांना सोपविण्यात आले. याप्रसंगी वर्धमान यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि वडील हेदेखील होते. त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतमाता की जयच्या गजरात त्यांचे हवाई दलाने स्वागत केले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतीही चर्चा केली नाही. हवाई दलाच्या अधिकार्यांनी संक्षीप्त शब्दांमध्ये परत आल्याची माहिती दिली. दरम्यान, अभिनंदन यांनी भारतीय हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी फटाक्यांची आतषबाजी केली असून मिठाई वाटून त्यांच्या सुटकेचे स्वागत करण्यात आले आहे.