जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ३६३ नवीन बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहर व चाळीसगाव तालुक्यात संसर्गाची वाढ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणारा कोरोनाचा संसर्ग आज देखील कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये तब्बल ३६३ नवीन पेशंट आढळून आले आहेत. आजच्या रूग्णांमध्ये सर्वाधीक बाधीत पेशंट हे जळगाव शहरात आहेत. शहरात एकूण १६२ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामुळे शहरातील संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, यासोबत चाळीसगावात ५३ रूग्ण आढळून आले असून तेथेही संसर्ग कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-164, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-6, अमळनेर-24, चोपडा-30, पाचोरा-3, भडगाव-3, धरणगाव-3, यावल-2, एरंडोल-11, जामनेर-3, रावेर-8, पारोळा-17, चाळीसगाव-53, मुक्ताईनगर-18, बोदवड-9 आणि इतर जिल्हे-3 असे एकुण 363 बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालात एकुण 59 हजार 585 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार416 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 1 हजार 790 बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.