मुंबई प्रतिनिधी । वांद्रा रेल्वे स्थानकात गर्दी जमवण्यासाठी अफवा पसरवणार्या विनय दुबे याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
काल सायंकाळी वांद्रा रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. यात बहुतांश परप्रांतीय मजूर हे आपापल्या गावी जाण्यासाठी आलेले होते. लॉकडाऊनच्या कालावधीत विशेष रेल्वे चालविण्यात येणार असल्याची अफवा पसरल्यानंतर वांद्रा येथे गर्दी उसळली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. दरम्यान, हा प्रकार नेमका कसा घडला याची चौकशी करण्यात आली. यात विनय दुबे या व्यक्तीने अफवा पसरवल्याने वांद्रा येथे गर्दी उसळल्याचे निष्पन्न झाले. यामुळे रात्री उशीरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटे अटक करण्यात आली आहे. विनय दुबे याला आज सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००